प्रवाशांना स्पेनला घेऊन जात असलेली बोट मोरोक्कोजवळ उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली.
50 हून अधिक प्रवासी बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत एकूण 80 प्रवासी होते, असे समजते. मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसआधी एका बोटीवरून 36 जणांना वाचवले होते. 2 जानेवारीला मॉरिटेनिया येथून ही बोट 86 प्रवाशांना घेऊन निघाली होती ज्यात 66 पाकिस्तानी प्रवाशांचा समावेश होता.
तसेच यादरम्यान वॉकिंग बॉर्डर्सचे सीईओ हेलेना मालेनो यांनी सोशल मीडियावर एक मोठी अपडेट दिली आहे ती म्हणजे, बोट उलटणाऱ्या घटनेत बुडणाऱ्यांमध्ये 44 जण पाकिस्तानी आहेत. दरम्यान पाकिस्तानी दूतावासाकडून एका टीमला पाकिस्तानी नागरिकांच्या मदतीसाठी दखला येथे पाठवण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.