Pervez Musharraf
Pervez Musharraf Team Lokshahi
ताज्या बातम्या

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचं निधन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी निधन झाले. संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते अमायलोइडोसिस या आजाराने ग्रस्त होते.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. त्याचे वडील सईद पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी काम करू लागले आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित होते.

79 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. यासाठी परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेली व्यक्ती आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य