India vs Pakistan : भारताचा पाकिस्तानला दणका India vs Pakistan : भारताचा पाकिस्तानला दणका
ताज्या बातम्या

India vs Pakistan : भारताचा पाकिस्तानला दणका; 'या' मागणीने उडवली पाकिस्तानची झोप

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेत भारताला करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

  • या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेत भारताला करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.

  • संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी भारतावर अनेक आरोप करत केले.

(India) भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेत भारताला करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी भारतावर अनेक आरोप करत म्हटले की, भारताने एकतर्फी निर्णय घेऊन करार निलंबित केला आहे आणि पाण्याचा वापर शस्त्रासारखा केला जात आहे. त्यांनी दावा केला की, या निर्णयामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो पाकिस्तानी नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला सिंधू जल करार सहा दशकांपासून दोन्ही देशांतील पाण्याचे वाटप नियंत्रित करत आहे. या करारानुसार सिंधू नदीच्या खोऱ्यातील सहा नद्यांपैकी पश्चिम नद्यांचा वापर पाकिस्तानकडे आणि पूर्व नद्यांचा वापर भारताकडे आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तानचा तोटा होत असल्याचे आता त्याला जाणवले असून, तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर करार पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहे.

पाकिस्तानच्या दाव्यानुसार, करारातील कोणताही नियम एकतर्फी निलंबनास परवानगी देत नाही. त्यामुळे भारताने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा