पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर मिसन राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. मात्र पाकिस्ताननं भारतावरच हल्ला चढवला. त्यालाही भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, भारताच्या ऑपरेशन सिंदूर मिशनची माहिती संपूर्ण जगाला कळावी, यासाठी केंद्रानं खासदारांना विविध देशांमध्ये माहिती देण्यासाठी पाठवलं. यावेळी कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले. मात्र आज भारतानं उच्चांक गाठला तर पाकिस्तान मागेच राहिला आहे. आज भारत जगातील चौथी मोठी अर्थ व्यवस्था बनली आहे. आणि लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जिथे भारत ४.२ ट्रिलियन इकोनॉमी बनला आहे. तर तिथे पाकिस्तान फक्त ४०० बिलियन इकॉनॉमिक पार करू शकला आहे. भारत जिथे टेक्नोलॉजी आणि टॅलेंट जगाला दाखवत आहे. तिथे पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. त्या प्रकारे भारत आज प्रगती करत आहे, लोकांना आणि जगाला शांती देशात नांदो हा प्रयत्न करत आहे."