ताज्या बातम्या

Lok शाही मराठी Special Report : ड्रॅगनची संगत पाकिस्तानला महागात, चीनकडून खरेदी केलेल्या प्रणालीचा धुरळा, वाचा एका क्लिक

पाकिस्तानची HQ-9 प्रणाली फेल; चीनची संगत महागात पडली.

Published by : Riddhi Vanne

पाकिस्तानने भारतावर ड्रोनचा हल्ला केला. तो आपल्या सैन्यदलाने उलथून टाकला. पाकिस्तानने हा प्रयत्न केला. तो HQ-9 या संरक्षण प्रणालीच्या भरवशावर पण आपल्या सुदर्शन चक्र अर्थात S-400 या संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या HQ-9 चा अक्षरश: कोळसा केला. ही संरक्षण प्रणाली पाकिस्तानने चीनकडून खरेदी केली आहे. त्यामुळे या चिनी मालाचा फोलपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. त्यात पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांची राखरांगोळी झाली. त्यात शेकडो दहशतवादी जागच्या जागी ठार झाले. दहशतवाद्यांचे नातेवाईकही ठार झाले. महत्त्वाचं म्हणजे दहशतवाद्यांची घरंही बेचिराख करण्यात आली. आपणच पोसलेल्या आणि वाढवलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे पाकिस्तानची पुरती तंतरली. म्हणून, हाडकुळ्या पाकिस्तानने भारताविरोधात बेंडकुळ्या दाखवायला सुरूवात केली.

पाकिस्तानचे नेते भारताविरोधात बरळू लागले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोनचे हल्ले केले. पण ते भारताने जागच्या जागी नेस्तनाबूत केले. आणि हे करताना भारताने सुदर्शन चक्र अर्थात S-400 ही हवाई संरक्षण प्रणाली वापरली.((S-400 चा आधीच्या पॅकेजला बनवलेला मोंटाज)) भारताचा हा प्रहार इतका जबरदस्त होता की पाकिस्तानची HQ-9 डिफेन्स सिस्टम फेल झाली. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानला नेहमीच दारात उभं करून भीक घालणाऱ्या चीनकडूनच पाकिस्तानने ही प्रणाली घेतली होती. त्यामुळे आता चीनची संगत पाकिस्तानला महागात पडली आहे.

खेळणी असो की घरगुती वस्तू आपण अनेकदा चिनी मालाची खिल्ली उडवतो. कारण चायना माल म्हणून ज्याची बदनामी झालेली आहे. त्या चिनी वस्तू कायमच फुटकळ निघाल्या आहेत. म्हणूनच आपण अनेकदा चायनीज माल खरेदी करत नाही. पाकिस्तानने मात्र याच चिनी मालाला आपलं केलं आणि HQ-9 संरक्षण प्रणाली खरेदी केली...आणि आता भारताविरोधात तिचा वापर केला. मात्र भारताच्या S-400 या संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या HQ-9 या प्रणालीला जागच्या जागी ठेचून काढलं. एकूणच, चिनी मालाच्या भरवशावर पाकिस्तानने भारताविरोधात आगळीक केली. पण भारताने पाकिस्तानचे दात जिथल्या तिथं घशात घातले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर

Video Viral : हिंदुस्तान जिंदाबाद... लंडनमध्ये मुस्लिम मुलींचं तिरंग्यासाठी भिडल्या; नेमकं प्रकरण काय?

AsiaCup 2025 : ...तरीही त्याला संघात संधी! कॅप्टन दादाकडून 'या' खेळाडूबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाला,

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द