जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर सध्या तणावाचे वातावरण आहे, या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला BSF कडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बीएसएफने राजस्थान सीमेवर एका पाकिस्तानी जवानाला (Pakistan Soldier)अटक करुन ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानी जवान सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता, त्यानंतर बीएसएफने त्याला रोखले आणि ताब्यात घेतले असून बीएसएफने पकडेल्या या पाकिस्तानी जवानाची सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.