( Imran Khan) पाकिस्तानातील माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला आहे. 9 मे 2023 रोजी घडलेल्या हिंसाचार प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
या घटनेत खान यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात मोडतोड आणि जाळपोळ केली होती. या संदर्भात खान आणि पीटीआयच्या अनेक नेत्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते.
मुख्य न्यायाधीश अफ्रीदी यांच्या अध्यक्षतेखालील त्रि-सदस्यीय खंडपीठाने, वकील सलमान सफदर आणि पंजाब सरकारचे विशेष वकील झुल्फिकार नक्वी यांच्या युक्तिवादानंतर हा निर्णय दिला. न्यायमूर्ती शफी सिद्दिकी आणि मियांगुल औरंगजेब हे देखील खंडपीठात सहभागी होते.
तथापि, तुरुंगातून सुटण्यासाठी खान यांना अजूनही ‘अल कादिर’ प्रकरणात जामीन मिळणे आवश्यक आहे, असे पक्षाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झुल्फीकार बुखारी यांनी स्पष्ट केले. सध्या इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी तुरुंगात आहेत.जामीन मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे.