ताज्या बातम्या

Pakistan Terror Attack : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती हल्ला,५ चिनी नागरिकांचा मृत्यू

पाकिस्तानतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघाती हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.

Published by : shweta walge

पाकिस्तानतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघाती हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात 5 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर एक स्थानिक ड्रायव्हरही मारला गेला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशी माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली.

पाकिस्तानात दोन दिवसात लागोपाठ दहशतवादी हल्ला झाल्याने पाकमधील नागरिक भयभीत झाले आहेत.खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 5 चिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वामधील शांगला येथे ही घटना घडली.

मारले गेलेले चिनी पेशाने इंजिनिअर होते आणि ते पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी काम करत होते. डॉन न्यूजनुसार, एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात घुसवले आणि दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या घटनेतील मृतांचा आकडाही वाढू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा