Palghar ST Bus Accident Team Lokshahi
ताज्या बातम्या

पालघरमध्ये जव्हार-सिल्व्हासा मार्गावर 2 एसटी बसचा भीषण अपघात

पालघर जिल्ह्यातून अपघाताची एक भंयकर घटना समोर आली आहे. पालघरच्या जव्हारमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

जव्हार | पालघर जिल्ह्यातून अपघाताची एक भंयकर घटना समोर आली आहे. पालघरच्या जव्हारमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.

जखमींना तातडीने जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशिक सिलवासा आणि जळगाव सिलवासा या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. आज सकाळच्या सुमारास जव्हार सिल्वासा मार्गावरील जयसागर डॅमजवळ हा अपघात झाला आहे.

अपघात इतका भीषण होता की, दोन्ही एसटी बस अक्षरश: चिरडल्या गेल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमींवर सध्या जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...