ताज्या बातम्या

Water Shortage In Palghar : Special Report धरण उशाला, तरी कोरड घशाला

पाणीटंचाई विशेष: पालघर जिल्ह्यात धरणं असूनही गावं तहानलेली. जलजीवन मिशनची कामं रखडलेली.

Published by : Prachi Nate

लखलखाट असलेल्या मुंबईचा शेजार त्यात भली मोठी धरणंही उशाला तरी इथल्या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. त्यामुळे शाळकरी मुलं-मुली दिवसभर डोक्यावर हंडा घेऊन भटकत राहतात. नाही म्हणायला जल जीवन मिशनती कामं सुरू झाली आहे. पण प्रशासनाच्या उदासीनतेच्या ढिगाऱ्यात ती बुडून गेली आहेत.

ही विहीर बघा आहे. खूप खोल पण त्यात पाणी किती आहे. तरीही त्यातच डबे टाकून लोक मिळेल तेवढं पाणी घेतात आहे. शेजारी छोटा तलाव आहे. पण पायाचा घोटाही बुडणार नाही, एवढंच पाणी त्यात आहे. म्हणूनच, गावात एखादी पाण्याची गाडी आली की लोकांचा असा गलका उडतो. तरीही पाणी मिळतच नाही. मग लहान लहान जीव पाणी नसलेल्या विहिरीतून पाणी काढतात. एवढं करून त्यांच्या पदरात पडतंय गढूळ पाणी ही सगळी परिस्थिती पालघर जिल्ह्याची आहे.

स्थानिक युवती, कऱ्हे गाव लोकशाही मराठीसोबत संवाद साधला. त्यावेळेस ती म्हणाली की, "पालघर जिल्ह्यात 1 हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून 564 पेक्षा अधिक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची काम सुरू आहेत. मात्र ही कामं अपूर्ण अवस्थेत असल्याने पालघरच्या पूर्व भागात सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पालघरच्या सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या तीरावर वसलेल्या कऱ्हे गावात सध्या महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणांमधून वसई विरार महानगरपालिका आणि मीरा भाईंदरसारख्या बड्या महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. मात्र याच धरणांच्या तीरावर वसलेल्या गावांना पाण्यासाठी विहिरीभोवती तासनतास पहारा द्यावा लागत आहे."

स्थानिक ग्रामस्थ, कऱ्हे गाव लोकशाही मराठीसोबत संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाली की, "पावसाळ्यात पालघर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस होत असला, तरी प्रशासनाच्या नियोजनाच्या ढिलाईमुळे लोकांच्या तहानेला आधार मिळत नाही आहे. त्यातच जलजीवन मिशनची कामं देखील मागील अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?