ताज्या बातम्या

kamal Chaurasias : "मी आता सहन करू शकत नाही,माझ्या मुलाला आईचा आशीर्वाद....." कमला पसंदच्या मालकाच्या सुनेनं घेतला टोकाचा निर्णय

दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध पान मसाला कंपनीचे मालक कमल किशोर चौरसिया यांच्या सूनेने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.

Published by : Riddhi Vanne

दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध पान मसाला कंपनीचे मालक कमल किशोर चौरसिया यांच्या सूनेने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. डायरीत गंभीर आरोप केले आहेत.

मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहार येथील दीप्ती चौरसियाने राहत्या घरी आपले जीवन संपवले आहे. तिचा मृत्यदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेतेत आढळला. तो मृत्यदेह तिचे पती हरप्रीत चौरसिया यांनी पाहिला. हरप्रीत यांनी दीप्तीला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

डायरीमध्ये नेमकं काय लिहिलयं...

दीप्ती यांनी या डायरीत लिहिले आहे की, ‘जर नात्यात प्रेम आणि विश्वास नसेल तर त्या नात्यात राहण्यात आणि जगण्याचे कारण काय? मी आता सहन करू शकत नाही. माझ्या मुलाला आईचा आशीर्वाद.’ त्यामुळे आता या आत्महत्येमागे पती कारणीभूत असल्याचे समोर येताना दिसत आहे.

दीप्ती आणि तिचा पती वेगवेगळ्या घरात राहत होते. दीप्ती आणि हरप्रीत चौरसिया यांते लग्न 2010 मध्ये झाले होते. त्यांना 14 वर्षांचा मुलगा आहे. हरप्रीतचे आणखी एक लग्न झालेले आहे. त्याची दुसरी पत्नी दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेत्री आहे. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. दीप्ती यांच्या भावाने आता हरप्रीत आणि त्यांच्या आईवर गंभीर आरोप केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा