ताज्या बातम्या

Panchayat Season 4 Cast Fees : सचिव जी की मंजू देवी! कोण ठरलं 'पंचायत 4' सर्वाधिक मानधन प्राप्तकर्ता?

पंचायत 4 हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून संपूर्ण स्टार कास्टचे शुल्क जाहीर झाले आहे. जाणून घ्या कोणी किती पैसे कमावले.

Published by : Prachi Nate

पंचायत या लोकप्रिय वेब सिरीजचे आतापर्यंतचे सर्व सीझन सुपरहिट ठरले आहेत. पंचायतचे आतापर्यंत 3 सीझन झाले प्रसारित झाले असून आता नुकताच पंचायत 4 हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पंचायतचे दीपक कुमार मिश्रा व अक्षय विजयवर्गीय हे दिग्दर्शक आहेत. त्याचसोबत चंदन कुमार लेखक आणि निर्माता आहेत. पंचायत 4 मध्ये नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, जितेंद्र कुमार, सान्विका, दुर्गेश, सुनीता राजवार व पंकज झा हे स्टार कास्ट पाहायला मिळाले आहेत. यादरम्यान पंचायत 4 मधील संपूर्ण स्टार कास्टचे शुल्क जाहीर झाले आहे. जाणून घ्या कोणी किती पैसे कमावले.

जितेंद्र कुमार म्हणजेच अभिषेक त्रिपाठी (सचिव जी) ​​यांनी किती फी घेतली?

जितेंद्र कुमार यांनी पंचायत या वेब सिरीजमध्ये अभिषेक त्रिपाठी आणि सचिव जी ही भूमिका साकारली आहे. त्यांनी सीझन 4 पासून प्रत्येक एपिसोडसाठी 70,000 रुपये घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

नीना गुप्ता आणि रघुबीर यादव म्हणजेच मंजू देवी (प्रधान-पत्नी) आणि ब्रिजभूषण दुबे (प्रधान-पती) यांनी किती फी घेतली?

नीना गुप्ता यांनी पंचायतमध्ये फुलेराची निवडून आलेली प्रधान मंजू देवी ही भूमिका साकारलेली आहे. त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी 50,000 रुपये घेतले आहेत. तर दुसरीकडे रघुबीर यादव यांनी ब्रिजभूषण दुबे जे प्रधान-पती आहेत ही भूमिका साकारली आहे. त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी 40,000 रुपये घेतले आहेत.

चंदन रॉयसह इतर कास्टची फी किती?

चंदन रॉय याने विकास (ग्रामपंचायत विकास अधिकारी) ही भूमिका साकारली होती. त्याचसोबत फैसल मलिकने प्रल्हाद चाचाची भूमिका साकारली होती. या दोघांनी प्रत्येक एपिसोडसाठी 20, 000 रुपये घेतले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा