सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ सुरु आहे. अनेकदा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना समस्यांनादेखील समोरे जावे लागते. अशीच एक अडचण पाचगणी येथील एका विद्यार्थ्याला आली. पाचगणी येथे एका विद्यार्थ्याला त्याची परीक्षा द्यायची होती. मात्र पाचगणीतील घाटामध्ये ट्रॅफिक जॅम झाल्याने त्याला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठी अडचण आली. त्यामुळे आता काय करायचे हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. दरम्यान यावेळी त्याची अवस्था पाहून पॅराग्लायडिंग केंद्र चलवणाऱ्यांनी एक शक्कल लढवली.
सातारा येथील पाचगणीतील पसरणीच्या घाटात एक अजब प्रकार घडलेला बघायला मिळाला. या ठिकाणी पर्यटकांसाठी पॅराग्लायडिंगचा उपक्रम गेली अनेक वर्ष सुरु आहे. या ठिकाणी एका पॅराग्लायडिंग प्रशिक्षकाने एका तरुणाला निराश बसलेले पाहिले. तरुणाने निराशेचे कारण सांगितले असतं तरुणाला थेट पॅराग्लायडिंग करुनच परीक्षास्थळावर पोहोचवले. या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमा झाले होते. त्यामुळे पॅराग्लायडिंग करुन घाट उतरवण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाला आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, वाई येथील पसरणी गावातील तरुणाचे नाव समर्थ महागडे आहे. सध्या तो बी कॉमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. परीक्षेची तारीख बदलल्याची माहिती त्याला नव्हती. त्यामुळे तो कामासाठी आला. मात्र मित्राने ही परीक्षा होणार असल्याचे सांगितले. तो लगेचच कामावरून परीक्षेसाठी निघाला मात्र घाटात त्याला खुप ट्राफिक मिळाले. दरम्यान त्याची ही समस्या तेथील लोकांनी जाणून घेतली आणि पॅराग्लायडिंग करुन त्याला परीक्षा केंद्रावर जाण्यास मदत केली.