Ashadhi Ekadashi 2025 : भाविकांच्या उत्साहात...,दिव्यांच्या झगमगाटात...उजळून निघाली पंढरी!  Ashadhi Ekadashi 2025 : भाविकांच्या उत्साहात...,दिव्यांच्या झगमगाटात...उजळून निघाली पंढरी!
ताज्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2025 : भाविकांच्या उत्साहात...,दिव्यांच्या झगमगाटात...उजळून निघाली पंढरी!

आषाढी एकादशी 2025: विठ्ठल भक्तांच्या उत्साहात पंढरी सजली, वारकऱ्यांच्या वारीची तयारी.

Published by : Riddhi Vanne

विठेवरती उभा कंबरेवरती हात असा हा सावळा पांडूरंग. पंढरीच्या वाटेवर चालणारे वारकरी आणि त्यांची वारी म्हणजे एक भक्तीमय सोहळा आहे.

अनेक वर्षापासून वारकरी टाळ, मृदुंगाच्या तालावर ज्ञानेश्वर आणि तुकोबाच्या नावाचा जयघोष करत वारी करत असतात.

कारण ओढ असते ते आपल्या विठ्ठल आणि रखुमाईला भेटीची, यामध्ये ते ऊन पावसाची पर्वा न करता अखंडपणे स्वतःला व जगाला विसरून चालत राहतात.

लाखो विठ्ठल भक्त पंढरपूरला भेट देतात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला 'दिंडी' या नावाने संबोधले जाते.

'वारी' करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परत यायचे.

तुकोबा, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या काही दिवसच विठोबाच्या पंढरीमध्ये दाखल होणार असून त्याच आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सजलं आहे.

विविध रंगाची उधळण, फुलाच्या माळ्यांनी मंदिरे सजले आहेत. आता फक्त वाट पाहत आहेत ती, म्हणजे आषाढी एकादशीची.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन उद्यापासून 'या' तारखेपर्यंत बंद राहणार

Latest Marathi News Update live : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; 17 वर्षांनी न्याय मिळणार का?

Kailas Gorantyal : कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार