ताज्या बातम्या

Murum Minning : पंढरपूर-कुर्डू गावात आज बंदची हाक; मुरूम उत्खनन प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी बंद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वायरल कॉल मुळे सध्या चर्चेत आलेल्या कुर्डू गावात मुरूम उत्खनना प्रकरणी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Published by : Prachi Nate

थोडक्यात

  • पंढरपूरच्या कुर्डू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक

  • मुरूम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद

  • कुर्डू गावाची बीडशी होत असलेल्या तुलनेच्या निषेधार्थही बंद

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या वायरल कॉल मुळे सध्या कुर्डू गाव चांगले चर्चेत आहे. याच कुर्डू गावात मुरूम उत्खनना प्रकरणी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. वेळीच गुन्हे माघारी न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर झालेल्या टीकेनंतर सरपंच ग्रामसेवक आणि गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे खोटे मागे घ्यावेत या मागणीसाठी आणि गावाची बदनामी करणाऱ्या नेत्यांच्या निषेधार्थ आज कुर्डू गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच सोमवारी माढा प्रांत कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Share Market Update : संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर रॉकेटसारखा वाढला 'हा' शेअर, अन् गुंतवणूकदारांच्या खिशात भरघोस फायदा

Raigad Crime : सोशलमीडियाची ओळख पडली महागात! अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर मात्र...

Jalgaon News : "अजून किती लाडक्या बहिण जाण्याची..." जळगावच्या 'त्या' भयानक घटनेवर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया

Modi 75th Birthday : मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात नवा उपक्रम