ताज्या बातम्या

Accident : पंढरपुरात 4 तरुणांना रेल्वेने उडवले; तिघांचा जागीच मृत्यू

पंढरपूरमध्ये (Pandharpur) रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

पंढरपूरमध्ये (Pandharpur) रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेत जखमी आणि मृत्युमुखी पडलेले तरूण मुळचे बिहारचे असून ते मजुरी काम करत असल्याचे सांगितले जात आहे. आज (3 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात चार मजूर रुळावरुन जात होते त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वेने या सर्वांना उडवले असल्याचे संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी (Railway Police) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी हलवले आहे . मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही. अपघातग्रस्त सर्वजण छत्तीसगडचे रहिवाशी असल्याचे समजते, पुढील तपास पंढरपूर रेल्वे पोलीस करीत आहेत.

दरम्यान, रुळाजवळ दारुच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत. त्यामुळे हे मजूर दारू प्यायलेले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा