Chhannulal Mishra 
ताज्या बातम्या

Chhannulal Mishra : पद्मविभूषण शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन

वाराणसीत आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • पद्मविभूषण शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन

  • वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालं

  • वाराणसीत आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

(Chhannulal Mishra) शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित छन्नूलाल मिश्र यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी पहाटे 4.15 वाजता मिर्झापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील काही काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) सर सुंदरलाल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डिस्चार्ज दिला गेला होता. मात्र, पुन्हा प्रकृती खालावल्याने गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मुलगी नम्रता यांनी दिली असून, पार्थिव सध्या मिर्झापूर येथे आहे.

छन्नूलाल मिश्र यांचे पार्थिव सकाळी 11 वाजेपर्यंत मिर्झापूरहून वाराणसीत आणले जाणार आहे. दिवसभर लोकांना अंतिम दर्शन घेता येईल. संध्याकाळी 7 वाजता वाराणसी येथे त्यांच्या अंत्यसंस्काराची अंत्ययात्रा होईल. छातीत दुखणे आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत छातीत संसर्ग, हिमोग्लोबिनची कमतरता आणि त्वचेच्या समस्या निदर्शनास आल्या. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली नाही.

पंडित मिश्र यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विशेष संबंध होते. 2014 मध्ये मोदींनी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा छन्नूलाल मिश्र हे त्यांचे प्रस्तावक होते. त्यांच्या योगदानासाठी 2010 मध्ये पद्मभूषण, तर 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारनेही त्यांना यश भारती पुरस्कार दिला होता. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महान युग संपुष्टात आले असून, संगीत रसिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhananjay Munde Dussehra Melva : दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंची शेरोशायरीतून विरोधकांवर जोरदार हल्ला

Bhagwangad : Dasara Melava : भगवानगडावरील दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो

Manoj Jarange Patil : दसरा मेळाव्याआधीच मनोज जरांगे पाटील यांचे, आव्हान म्हणाले...

PM Narendra Modi : RSSच्या शताब्दीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन