ताज्या बातम्या

Vikram Singh Pachpute Special Report : भेसळयुक्त दूध; पनीरमुळे कॅन्सरला निमंत्रण; विक्रमसिंह पाचपुते यांचा गौप्यस्फोट

भेसळयुक्त दूध आणि पनीरमुळे कॅन्सरचा धोका; विक्रमसिंह पाचपुते यांचा खळबळजनक गौप्यस्फोट. बनावट दूध आणि पनीर ओळखण्याचे मार्ग जाणून घ्या.

Published by : Prachi Nate

दूध असो की पनीर, आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत हे पदार्थ हवे असतात. सणसुद असो की रोजचं जेवण प्रत्येकाला दूध, दही आणि पनीरसारखे दुधाचे पदार्थ हवे असतात. तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच आहारात रोज दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकदा आपण घरी किंवा हॉटेलमध्ये पनीर खातो. मात्र, या दूध आणि पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांचं मोठं रॅकेट कार्यरत आहे. मात्र, या दुधात विष कालवण्याचा प्रकार समोर आला. म्हणूनच, स्वत:च्या फायद्यासाठी लोकांच्या जेवणात विष कालवणाऱ्यांचा पर्दाफाश लोकशाही मराठी करत आहे. त्याचसोबत, आम्ही बनावट दूध आणि पनीर कसं ओळखावं, हे सुद्धा सांगणार आहोत.

भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे आणि हा गौप्यस्फोट तुमची आमची झोप उडवणारा आहे. कारण, विक्रमसिंह पाचपुतेंनी भेसळ केलेलं पनीर माध्यमांसमोर आणि थेट सभागृहातच धडधडीतपणे दाखवल आहे. बाजारात मिळणारं 70 टक्के पनीर हे भेसळ केलेलं असल्याचा दावा त्यांनी केला आणि खळबळ उडाली. महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या राज्यातून हे बनावट पनीर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. आणि अशी भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप किंवा फाशी द्यायला हवी अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रात रोज सुमारे 1 कोटी 70 लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं. आणि महाराष्ट्राची रोजची दुधाची गरज ही 70 लाख लिटर इतकी आहे. त्यातून उरलेल्या १ कोटी लिटर दुधाचे रोज दूध पावडर, बटर, पनीर इत्यादी पदार्थ बनवले जातात. त्यामुळे इतक्या प्रमाणात जर दुधाची गरज असेल तर, त्यात होणारी भेसळ ही फार मोठ्या संकटाची ग्वाही असणार हे नक्की. त्यामुळे, तुमच्या आमच्या ताटात आणि दुधात स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी विष कालवणाऱ्या या पुतना मावशीला चांगलाच धडा शिकवायला हवा. तोही असा की पुन्हा कुणी दुधात किंवा पनीरमध्ये भेसळ करण्यास धजावणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?