महाराष्ट्रातील पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बीडचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला जालन्याचे पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. जालन्यातून प्रचंड चांगला प्रतिसाद येत आहे. लोक उत्साहात आहेत. मी प्रत्येकवेळी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते. प्रत्येकवेळी तुम्हाला सेम काम करायला मिळते असे नाही. मी बीडची लेक आहे.
बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सर्वात जास्त विकसनशील राहिलेला आहे. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठलीही असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.