Pankaja Munde Reaction Shivsena Dasara Melava  Team Lokshahi
ताज्या बातम्या

शिवसेनेच्या मेळाव्यांबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या...

आज राज्यामध्ये एकूण 4 मेळावे होत आहेत. त्यापैकी, शिवसेनेच्या दोन गटांचे दोन मेळावे होणार आहेत.

Published by : Vikrant Shinde

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा दसरा मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. व त्यानंतर सुरू झाला तो पक्ष मिळवण्यासाठीचा संघर्ष. दोन्ही गटांकडून शिवसेना पक्ष हा आपलाच असल्याचा दावा केला जात आहे.

पंकजा मुंडे यांनी दिली शिवसेनेच्या मेळाव्यांवर प्रतिक्रिया:

पंकजा मुंडे यांना शिवसेनेच्या उद्धव गट व शिंदेगटाच्या दसरा मेळाव्याविषयी विचारणा केल्यानंतर, "दोघांनाही माझ्याकडून शुभेच्छा आहेत. दरम्यान, जनता सुज्ञ आहे. जनतेला सगळं कळतं" अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

शिवसेनेचे दोन्ही मेळावे चर्चेत:

राज्यातील राजकीय क्षेत्रांत भुकंप झाल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा या वादानंतर दसरा मेळावा कोण घेणार यावरूनही राजकारण झालं. अखेर आज उद्धव ठाकरे व शिंदेगट हे दोन्ही पक्ष दसरा मेळावे घेत आहेत. दोन्ही गटांकडून शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, संपुर्ण राज्याचं या मेळाव्यांकडे लक्ष लागून आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा