Rishabh Pant: पंतच्या नावे नवा विक्रम! 93 वर्षांत कोणी नाही करु शकलं ते रिषभ पंतने केलं Rishabh Pant: पंतच्या नावे नवा विक्रम! 93 वर्षांत कोणी नाही करु शकलं ते रिषभ पंतने केलं
ताज्या बातम्या

Rishabh Pant: पंतच्या नावे नवा विक्रम! 93 वर्षांत कोणी नाही करु शकलं ते रिषभ पंतने केलं

93 वर्षांत इंग्लंडविरुद्ध सामन्यात जे आतापर्यंत कोणालाही जमल नाही ते पंतने करुन दाखवलं आहे.

Published by : Prachi Nate

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार रिषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतक करणाऱ्या यष्टीरक्षकाचा विक्रम मोडला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यात रिषभ पंतने दमदार कमबॅक केलं आहे. 93 वर्षांत इंग्लंडविरुद्ध सामन्यात जे आतापर्यंत कोणालाही जमल नाही ते पंतने करुन दाखवलं आहे.

आयपीएल दरम्यान पंतला त्याच्या खेळीमुळे ट्रोल केल जात होत. मात्र आता त्याने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. कसोट क्रिकेटमध्ये एका सामन्याच्या दोन्ही डावांत भारताच्या सात खेळाडूंनी शतकं झळकावली आहेत. रिषभ पंत कसोटी सामन्यात असा एकमेव खेळाडू ठरला आहे ज्याने इंग्लंडमध्ये सामना खेळताना दोन्ही डावांत शतकं ठोकलं आहे. त्यामुळे पंतच्या नावे मोठा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. रिषभ पंतचे हे शतक केवळ वैयक्तिक कामगिरीपुरते मर्यादित नाही, तर भारतीय क्रिकेटसाठीही एक नवा इतिहास घडवणारे ठरले आहे.

रिषभ पंतनेही दुसऱ्या दिवशी आपले शतक ठोकताच अनोख सेलीब्रेशन केलं आहे. दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने 178 बॉलमध्ये 134 धावा करत नाबाद खेळी खेळली. तर त्याने कर्णधार शुभमन गिलला 209 धावांची भागीदारी करुन दिली. यावेळी गिलनेही 227 बॉमध्ये 147 धावांची खेळी खेळली होती. पंतचं यापुर्वीचं शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक असून तो कसोटी सामन्यात सर्वाधिक शतक मारणारा विकेटकिपर बनला आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीला देखील मागे सोडलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा