ताज्या बातम्या

Panvel-Karjat Local : पनवेल- कर्जत अवघ्या 30 मिनिटांत, कसं ते जाणून घ्या…

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरचे काम खूपच वेगाने सुरू आहे. या कॉरिडॉरचे काम ८५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. हा प्रोजेक्ट मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published by : Varsha Bhasmare

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरचे काम खूपच वेगाने सुरू आहे. या कॉरिडॉरचे काम ८५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. हा प्रोजेक्ट मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पनवेल कर्जत कॉरिडोर तयार करण्यासाठी सुमारे २,७८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही चौथी मार्गिका तयार झाल्यावर, पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अवघ्या ३० मिनिटांवर येणार आहे. प्रकल्प तयार झाल्यानंतर पनवेल, मोहोपे, चिखले चौक आणि कर्जत या पाच स्थानकांवर थेट रेल्वे सेवा मिळणार आहे. सध्या प्रकल्पाचे पायाभूत काम जवळपास पूर्ण झाले असून, तीन बोगद्यांचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

ट्रॅकची बॅलास्टिंग, टॅपिंग कामे पूर्ण फ्लायओव्हरवरील गर्डर लाँच केले गेले आहेत आणि मोहपे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम यशस्वीरित्या पार पडले आहे. तसेच ट्रॅक आणि ओव्हरहेड इलेट्रिक (ओएचई) काम पूर्ण करण्यासाठी एमआरव्हीसीने बेलापूर-पनवेलदरम्यान मेगाब्लॉक घेतला होता, ज्यामध्ये टॅकची बॅलास्टिंग आणि टॅपिंग कामे पूर्ण झाली असून लवकरच कर्जत – पनवेल लोकल ट्रेन प्रवाशांच्या भेटीला येणार आहे.

बोगद्यात बसवल्या संरक्षक जाळ्या

कर्जत व पनवेल शहरांचा भविष्यात होणारा विकास लक्षात घेऊन सात-आठ वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने कर्जत – पनवेल रेल्वेमार्ग उभारला, हा एकेरी मार्ग केल्याने, शिवाय दीड किमी लांबीचा बोगदा असल्याने या बोगद्यातील ठिसूळ दगड वारंवार कोसळत होता. कोकण रेल्वेच्या धर्तीवर वा बोगद्यात संरक्षक जाळ्या बसवल्यानंतर दरड पडणे थांबल्याने आता तरी या मार्गादर शटल अथया लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली असून प्रवाशांनी पत्राद्वारे तशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. प्रथम या मार्गावर मालगाड्या सुरू केल्या. त्यातून मध्य रेल्वेला वार्षिक १२ लाख रुपये उत्पन्न मिळू लागले.

कर्जत-खालापूरच्या तरुणांना रोजगार संधी

या मार्गावर हळुहळू जालद गाऊया धावू लागल्या. आता कर्जत पनवेल लोकल सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा पनवेल आणि कर्जतवासीयांना होती. पनवेल-कर्जत शटल सेवेमुळे कर्जत-खालापूरमधील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होतील, पनवेलमधील प्रस्तावित विमानतळ आणि नवी मुंबईतील रोजगार संधीचा फायदा त्यांना मिळेल, महामुंबईतील प्रवाशांना नव्या रेल्वे मार्गाचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी पनवेल-कर्जत नवीन उपनरीय मागांचे काम सुरू आहे. या मार्गामुळे मुंबईतून पनवेलमार्गे कर्जतला जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

प्राथमिक वेळापत्रक देखील तयार

पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग हा मुंबई-पुणे जुना महामार्गाजवळून जातो, त्यामुळे येथे रोड ओव्हर पुलांचे काम सुरू आहे. महत्वाचे म्हणजे पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवरून लोकल ट्रेन चालवण्यासाठी प्राथमिक वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. या मार्गासाठी १२ डब्यांच्या ३ लोकल गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत, या गाड्या दिवसभर धावणार आहेत. हा नवीन मार्ग दोन जुन्या स्थानकांना जोडण्यात येणार आहे जयामध्ये उपनगरातील सर्वात मोठा बोगदा आणि पुलाचा देखील समावेश आहे, याआधी या मार्गावर मालगाड्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या धावत होत्या, पण आता नव्या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेलमार्गे कर्जतपर्यंत लोकल ट्रेन धावू शकणार आहेत. त्यामुळे कर्जत, पनवेल भागामध्ये राहणा-यांचा प्रवास सोपा आणि सुसाट होणार आहे.

२,७८३ कोटींचा निधी मंजूर

सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने येण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास १ तास ५० मिनिटांचा होणार आहे. या प्रोजेक्टसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला २.७८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पाव ते सहा महिन्यात पूर्ण करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने उद्दिष्ट आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा