ताज्या बातम्या

Ratnagiri Accident : 'त्या' अपघातातील जखमी चालकानंही गमावला जीव; पत्नी आणि मुलाच्या मृत्युनंतर पतीचाही मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता. रत्नागिरीच्या खेड येथे कार अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Published by : Rashmi Mane

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता. रत्नागिरीच्या खेड येथे कार अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच अपघातातील चालक परमेश रामकृष्ण पराडकर (वय 52) यांचाही सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पत्नी आणि मुलानंतर आता पतीचाही मृत्यू झाल्यानं संपूर्ण कुटुंबच या अपघतात मृत्युमुखी पडले आहे.

जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे 100 फूट खोल दरील कार कोसळून हा भीषण अपघात झाला होता. मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली होती. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला होता. तर, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मुंबईतील रहिवाशी होते.

अपघातातील मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19) , श्रेयस राजेंद्र सावंत (23) यांचा समावेश आहे. दोन कुटुंबातील हे लोक मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाले होते.

हे दोन्ही कुटुंब मुंबई मिरारोड-भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास गावी देवरूख येथे जाण्यास निघाले होते. आपल्या ताब्यातील किया कारने हे कुटुंब निघालं होतं. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली. ही भीषण घटना पहाटे पाच ते साडेपाच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. मात्र, अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहिर केलं होत.

अपघातानंतर गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हलवण्यात आलं होतं. तर, गंभीरित्या जखमी झालेले विवेक मोरे यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आलं होतं. किया कार क्रमांक MH 02 3265 ही कार घेऊन मुंबई मिरारोड इथून गावी निघाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच