भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना पिगी बँक भेट देणाऱ्या मुलाच्या पालकांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथे घडली असून. ईडीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मनोज परमार आणि त्यांची पत्नीने नेहा यांनी गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या केल्यांची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मनोज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) समोर आली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.आठ दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने इंदूर आणि सिहोर येथील परमार यांच्या चार ठिकाणांवर छापे टाकले होते. यावेळी अनेक जंगम आणि जंगम मालमत्तांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये त्यांच्या मुलांनी राहुल गांधींना त्यांचा पैसा जमा करण्याचा गल्ला दिल्यावर मनोज परमार चर्चेत आले होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान एका मुलाने त्यांना पिगी बँक भेट दिली होती. मनोज आणि नेहा परमार यांचा तो मुलगा होता. तेव्हापासूनच भाजपाने त्यांना लक्ष्य केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसचे मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्षांनी मनोज परमार यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची भेट घेतली.