ताज्या बातम्या

Paresh Rawal : 'Hera Pheri 3 ' मधून बाहेर पडण्याबाबत परेश रावल यांनी मौन सोडले, म्हणाले...

परेश रावल: 'हेरा फेरी 3' मधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट केले.

Published by : Riddhi Vanne

गेल्या वर्षी निश्चित झालेल्या फिर हेरा फेरी 3 चे शुटिंगला सुरुवात होणार आहे. 'हेरा फेरी' बोलं की आठवते की, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. पण आता त्यामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. बाबूराव आपटे हे नाव ऐकाले की, समोर येतो तो, परेश रावल यांचा चेहरा परंतू यंदा परेश रावल यांना चित्रपटातून वगळण्यात आल्याची बातमी निश्चित झाली आहे.

अलिकडेच बातमी आली की परेश रावल यांना 'हेरा फेरी 3' Hera Pheri 3 मधून वगळण्यात आले आहे. निर्मात्यांशी असलेल्या मतभेदांमुळे, अभिनेत्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानेही या वृत्ताला पाठिंबा दिला. आता पहिल्यांदाच, त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि सर्जनशील मतभेदांमुळे चित्रपट सोडण्याच्या अफवेवर आपले मौन सोडले आहे.

'हेरा फेरी ३' मधून बाहेर पडताना परेश रावल बोलले

परेश रावल यांनी 18 मे रोजी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी निर्मात्यांमुळे चित्रपट सोडला नाही. परेश यांनी ट्विट केले, "मी हे नोंदवू इच्छितो की हेरा फेरी ३ पासून दूर राहण्याचा माझा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे नव्हता. मी पुन्हा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी कोणताही सर्जनशील मतभेद नाही. चित्रपट दिग्दर्शक श्री प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा