Raghav Chadha, Parineeti Chopra Team Lokshahi
ताज्या बातम्या

खासदार राघव चड्ढांचा मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश? नेटकरी म्हणाले, “लडकी का चक्कर…”

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

Published by : shweta walge

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यामध्येच आता राघव चड्ढा यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते रॅम्पवॉक करताना दिसत आहेत.

राघव चड्ढा यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०२२ मध्ये झालेल्या Lakme Fashion Show मधला आहे. ज्यामध्ये राघव चड्ढा यांनी प्रथमच रॅम्पवॉकमध्ये सहभाग घेतला होता. या रॅम्पवॉकदरम्यान त्यांनी लेदर जॅकेट घातलं होतं. राघव चड्ढा यांच्या रॅम्पवॉकचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

परिणीतीची चुलत बहीण आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने परिणीती आणि राघवचे अभिनंदन करण्यासाठी तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यावर, ‘मिमी दीदी, लवकरच तुला नवऱ्यामुलीला सगळी मदत करायची आहे,’ अशी कमेंट परिणीतीने केली आहे.

राघव यांच्या रॅम्पवॉकच्या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं, ‘जिजाजींची बॉलीवूडमध्ये एन्ट्री’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘जिजाजी हिरो बनू शकतात,’ एका चाहत्याने लिहिलं, ‘तुम्ही हे करू शकता भाऊ.’ दुसऱ्या यूजरने कमेंट केली की, ‘जेव्हा मी हे चित्र पाहिलं तेव्हा मला वाटलं, राघव जुयाल आहे, आता मला आश्चर्य वाटलं.’ तर, ‘बाबूभय्या लडकी का चक्कर,’ असं म्हणत एकाने कमेंट केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 33 किलो हायड्रो गांजा जप्त, आठ जण अटकेत