ताज्या बातम्या

Supriya Sule : पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या...

पुण्यातील नवले ब्रिजवर मोठा अपघात झाला. आज खासदार सुप्रिया सुळे नवले पुलाची पाहणी करणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, पुण्यात महत्वाची व्हिजीट आहे. आठवड्याला व्हिजीट असते. ⁠

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

पुण्यातील नवले ब्रिजवर मोठा अपघात झाला. आज खासदार सुप्रिया सुळे नवले पुलाची पाहणी करणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, पुण्यात महत्वाची व्हिजीट आहे. आठवड्याला व्हिजीट असते. ⁠नवले ब्रिजच्या पाहणीसाठी जाणार आहे. निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यांना योग्य वाटेल ते सुरू आहे. किती सीट लढतोय, याबद्दल मंगळवारी सांगता येईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत त्या विनंती करताना देखील दिसल्या. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गडकरी यांचे आभार मानते. ⁠एनजीओ ब्लॅक स्पॉट बघतात. दुसरे तंत्रज्ञान वापरता येईल. आठ महिन्यापासून मोकळा श्वास घेत होतो. ⁠दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी घटना घडली. सेफ्टी आणि चेकिंग महत्वाची आहे.

गडकरी यांना विनंती करणार आहे, फक्त बोर्ड सेफ्टी वर बेल्ट हेल्मेंट कसे लावावे. स्ट्रॉंग पॉलिसी कशी करता येईल हे महत्वाचे आहे. ⁠देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, रोड सेफ्टीबद्दल मोठा कार्यक्रम घ्या आम्ही साथ देऊ. यादरम्यान पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारा त्यांना वास्तव माहिती असेल याबद्दल. पार्थ पवार प्रकरणात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले आहे.

काँग्रेसबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले, अंतर्गत चर्चा झाली. आमच्यात चर्चा झाली नाही. जेव्हा ते एकत्र होते तेव्हाही ते वेगळे लढले होते. महाराष्ट्रात वेगळ काही होत नाही. अंजली दमानिया यांच्याकडून पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आली. त्यावर बोलताना सुळेंनी म्हटले की, अंजली दमानिया ह्या अनेक गोष्टी मांडत असतात. ईडी स्वायस्थ संस्था आहे. ईडीवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. संस्था चांगली आहे अदृश्य शक्ती जी मागे आहे त्यामुळे असे होते.

सुप्रिया सुळे यांनी बोलताना पुढे म्हटले की, महिला पत्रकारांनी एकत्र येऊन एक अहवाल तयार करायला हवा. आपण विशाखा समिती बाबत नेमकी परिस्थिती काय आहे बाबत एक अहवाल तयार करूया आणि तो सरकारला देऊया. सध्याच सरकार म्हणत आहे 70 साल मे काँग्रेसने क्या किया…माझा विचार करायला गेलं तर मी शिक्षण घेऊ शकले, शाळेत सुरक्षित जात होते आता मात्र तसं नाही. तुम्ही कधी ऐकलं होतं का की बिबट्या नाशिकमध्ये जुन्नरमध्ये आला आहे. मात्र, आता आपण पाहतोय काय परिस्थिती निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा