ताज्या बातम्या

पार्थ पवारांनी आमदार अमोल मिटकरीना फटकारल; नेमकं प्रकरण काय?

पार्थ पवारांनी आमदार अमोल मिटकरीना फटकारल; अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या नरेश अरोरा प्रकरणावरून मिटकरी यांनी पक्षावर टीका केली होती. पार्थ पवारांनी मिटकरी यांच्या मतांचा पक्षाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

Published by : shweta walge

नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो समोर आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पक्षावरच टीका केली होती. यावर आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी मिटकरी यांचं मताचा पक्षाशी संबध नसल्याचं म्हंटल आहे. मीडियात अश्या टिप्पणी करू नका अस म्हणत पार्थ पवारांनी अमोल मिटकरीना फटकारलं आहे.

ते म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की आमदार अमोल मिटकरी पक्षाचे आमदार असूनही, पक्षविरोधी भूमिका घेणे पसंत केले आहे. माझा पक्ष आणि माझे वडील अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्पष्टपणे कोणत्याही प्रकारे श्री अमोल मिटकरी यांच्या मतांचे समर्थन करत नाहीत किंवा त्यांच्याशी सहमत नाहीत. या प्रकरणावर अशा प्रकारच्या टिप्पण्या करण्यापासून किंवा मीडियाला प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त करण्याचे त्यांना आग्रहाचे आवाहन पार्थ पवार यांनी केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या नरेश अरोरा यांना काही प्रश्न विचारण्यासाठी मी ट्विट केलं होतं मात्र माझ्या काही सहकाऱ्यांनी मला ते डिलीट करायला लावलं होत. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरील ट्विट मधील कंटेंट हे नरेश अरोरा यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता.

राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी काय घरी बसायचं काम केलं का असा सवालही मिटकरी यांनी अरोरा यांना विचारला. तुम्ही यशाचे श्रेय घ्या तुमच्यासारख्या पाच पीआर एजन्सी या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मात्र त्यामधील कुणीही भांडवल केलं नाही आणि कुणीही त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत केली नाही. असा टोलाही मिटकरी यांनी लगावला. तर अजित पवार यांच्यावर खांद्यावर हात ठेवणे म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान आहे त्यामुळे मी निषेध नोंदवतो असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. तर नरेश अरोरा यांनी माफी मागावी असं देखील मिटकरी म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा