नागपूरकरांसाठी यंदा रेल्वे प्रशासन वंदे भारत एक्सप्रेसची सफर घडवणार आहे. निश्चितच नागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची अशी ही बातमी आहे विदर्भातील प्रवाश्यांना नागपूर पुणे मुंबई प्रवास आता वंदे भारत एक्सप्रेमधून करता येणे शक्य होणार आहे, सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदोर आणि नागपूर भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. त्यात नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. येत्या काही महिन्यात ह्याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रवाश्यांना मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवनियुक्त डीआरएम विनायक गर्ग यांनी दिली आहे.
कोकणापाठोपाठ नागपूर ते मुंबई नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र त्या मानाने रेल्वे गाड्यांची संख्या खूपच कमी आहे . त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना वेटिंग लिस्ट waiting list पाहुन च घाम फुटतो. ज्यांना खरच गरज आहे अश्यांना जास्त पैसे देऊन दुसऱ्या खाजगी गाडयांचा पर्याय निवडावा लागतो . गेल्या दोंन वर्षापासून प्रवाशांकडून जादा गाड्यांची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाच्या या मार्गावर 'वंदे भारत एक्सप्रेस' सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर यंदा नागपूरकरांना "गर्मी मे भी थंडी का एहसास" मिळेल यात शंका नाही. नागपूर ते मुंबईदरम्यान मेल एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी 16 तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ 10 तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा खुप वेळ वाचणार यात शंका नाही. काही काळापुर्वी जर वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता जर मिळाली तर वंदे भारत एक्सप्रेसच्या निमित्ताने दोन्ही मार्गावर प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.