ताज्या बातम्या

Accident News : 'Indian Idol' S12 च्या विजेत्याचा भीषण अपघात

अपघात बातमी: 'इंडियन आइडल' विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, ICU मध्ये दाखल.

Published by : Team Lokshahi

'इंडियन आइडल' Indian Idol 12 व्या सिझनचा लोकप्रिय विजेता गायक पवनदीप राजनचा Pawandeep Rajan आज पहाटे 4.30 वाजता भीषण अपघात झाला. या गंभीर अपघातामध्ये पवनदीपला वाचवण्यात आले आहे. त्याला एका खाजगी रुग्णालयातमध्ये ICU विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. पवनदीपच्या अपघाताची बातमी चाहत्यांना मिळताच चाहते तो लवकर बर होण्याची प्रार्थना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली- उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गावर गजरौलाजवळ त्याच्या कारचा अपघात झाला. रस्ता अपघाताच्यावेळी पवनदीप उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. स्थानिक लोकांच्या माहितीवरुन पोहचलेल्या पोलिस पथकाने पवनदीपबरोबरच इतर प्रवाशांना वाचवण्यात आले.

हा अपघात इतका भीषण होता की कारचे अक्षरश: चुराडे झाले आहेत. गाडीच्या अवस्थेवरुन अपघाताची तीव्रता स्पष्टेपण दिसून येते. डॉक्टरांच्या पथकाकडून पवनदीपवर उपचार केले जात आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा