ताज्या बातम्या

Sharad Pawar : कृषिमंत्री राहिलेले पवार मराठवाड्यातील परिस्थिती पाहून अवाक

मराठवाड्यासह अनेक भागात पावसाने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, देशाचे माजी कृषिमंत्री म्हणून पद भूषविलेले शरद पवारही (Sharad Pawar) बरसणारा पाऊस पाहून चिंतेत पडले आहेत.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • अशी अतिवृष्टी पूर्वी कधीही पाहिली नाही – पवार

  • मदत करण्याची जबाबदारी केंद्र अन् राज्याची

  • शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहिलं त्याचा विचार गरजेचा

मराठवाड्यासह अनेक भागात पावसाने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, देशाचे माजी कृषिमंत्री म्हणून पद भूषविलेले शरद पवारही (Sharad Pawar) बरसणारा पाऊस पाहून चिंतेत पडले आहेत. शेतकऱ्यांना मदत करणं ही केंद्र सरकार व राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्य सरकारने केंद्राच्या योजनेतून शेतकऱ्यांसाठी (Farmer) मदत करावी, अशी विनंती शरद पवारांनी केली आहे. पुढचे ४ दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून, हवामान खात्यानं ज्या पद्धतीने अंदाज वर्तवले आहे. तसेच घडत असल्याचे पवार म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अशी अतिवृष्टी पूर्वी कधीही पाहिली नाही – पवार

पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवार म्हणाले की, दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. “आपण दुष्काळ पाहिला. पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असल्याचे पवार म्हणाले. पीक वाहून गेलं तर त्या वर्षीचं नुकसान होतं. पण जमीन वाहून गेली, तर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते. त्यामुळे फक्त पिकांसाठी मदत करून चालणार नाही, जमिनीसाठीही मदत करावी लागेल.

सोयाबीन पीक भरवशाचे पिक पण…

पुढे बोलताना पवार म्हणाले की, यंदा राज्यात अभूतपूर्व पाऊस पडला आहे. जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीचा परिणाम शेतकऱ्यांच्या संसारावर झाला आहे. साधारणपणे या महिन्यांमध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. सोयाबीन हे भरवश्याचं पीक असतं. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ झाल्यानंतर पाच दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकं कुजून गेल्याचे पवारांनी सांगितलं.

मदत करण्याची जबाबदारी केंद्र अन् राज्याची

सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. असे संकट येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या वापरून नुकसानभरपाई करणे गरजेचे आहे. जमीन वाहून गेलं, पिक गेलं, माती गेली या तिन्ही गोष्टींची नुकसान भरपाई दिली पाहिजे असे पवार म्हणाले.

शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहिलं त्याचा विचार गरजेचा

अनेक ठिकाणी गुरे वाहून गेली आहेत. या सगळ्या गोष्टींकडे राज्य सरकारने तात्काळ बघावं. तसेच शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पंचनामे करून तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत करावी. शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहील याचा सरकारने विचार करावा. पुढचे ४ दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून, हवामान खात्यानं ज्या पद्धतीने अंदाज वर्तवले आहे. तसेच घडत असल्याचे पवार म्हणाले. मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाल्याचे सांगत हवामान खात्याने शेतकऱ्याला सावध केलं पाहिजे असे पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Torres : टोरेसनंतर पुन्हा मोठा घोटाळा; TWJ कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक, 'या' जिल्ह्यात गुन्हे दाखल

Maharashtra Cabinet Decision : फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले '8' मोठे निर्णय

Heavy Rainfall Marathwada : मराठवाड्यावर आभाळ फाटलं; NDRF-SDRF ने दिलेल्या निकषानुसार मदतीने दर काय?

Cm devendra fadnavis : पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू ,फडणवीसांनी सांगितला आकडा