ताज्या बातम्या

PF Transfer Process : आता EPFO खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया होणार आणखी सोपी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कोट्यवधी नोकरदारांचे पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे.

Published by : Rashmi Mane

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कोट्यवधी नोकरदारांचे पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. त्यामुळे येत्या काळात कोणी नोकरी बदलली तर पीएफ खाते ट्रान्सफर करणे आणखी सोयीचे होणार आहे. EPFO ने नोकरी बदलताना पीएफ खात्यांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.

EPFO च्या या सुविधेमुळे नियोक्त्याच्या मंजुरीची गरज जवळपास नाहीशी होईल. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी सांगितले की, EPFO ने फॉर्म 13 मध्ये बदल केले आहेत. ज्याचा 1.25 कोटींहून अधिक सदस्यांना फायदा होणार आहे. तसेच, EPFO ने आधार सीडिंगशिवाय नियोक्त्यांकडून मोठ्या प्रमाणात UAN जनरेशनची सुविधादेखील सुरू केली आहे.

यापूर्वी नोकरी बदलल्यास पीएफची रक्कम हस्तांतरित करण्यात दोन EPF कार्यालयांची भूमिका होती. ज्या स्रोत कार्यालयातून पीएफ रक्कम हस्तांतरित करायची होती त्या कार्यालयासोबतच, ज्या ठिकाणी रक्कम जमा करायची होती, त्या कार्यालयाला देखील कारवाई करावी लागत होती. खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीत बदलली जाते. अशावेळी त्यांना त्यांचे EPF खाते हस्तांतरित करावे लागते.

ईपीएफओने EPF खाते हस्तांतरित करण्यासाठी नियोक्त्याच्या मंजुरीची अट काढून टाकली असून आता बहुतेक प्रकरणांमध्ये याची गरज राहणार नाही. यासाठी ईपीएफओने फॉर्म 13 सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. परिणामी, EPF खाते हस्तांतरणासाठी डेस्टिनेशन ऑफिसची मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही तर, स्रोत कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ईपीएफचे पैसे गंतव्य कार्यालयात हस्तांतरित केले जाणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा