ताज्या बातम्या

दिलासादायक! पेट्रोल - डिझलच्या किमती झाल्या कमी

आजचे पेट्रोलचे दर मुंबई शहरात १०३.५० रुपये असून डिझेलचे दर ९०.०३ रुपये आहे. तर पुण्यात पेट्रोल दर १०४.०२ रुपये आणि डिझेल ९०.४९ रुपये आहेत.

Published by : Rashmi Mane

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत होणाऱ्या वाढीला कंटाळलेल्या वाहनचालकांसाठी सध्या दिलासादायक माहिती समोर आली आहे. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत असून आपल्या शहरात पेट्रोल - डिझेलचे काय दर आहेत, याची उत्सुकता वाहनचालकांना आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. दररोज सकाळी हे दर जाहीर केले जातात.

आजचे पेट्रोलचे दर मुंबई शहरात १०३.५० रुपये असून डिझेलचे दर ९०.०३ रुपये आहे. तर पुण्यात पेट्रोल दर १०४.०२ रुपये आणि डिझेल ९०.४९ रुपये आहेत. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०२ रुपये तर डिझेल ९०.५८ रुपये आहे. तसेच बुलढाणात पेट्रोल दर १०४.८८ रुपये असून डिझेलचे दर ९१.४३ रुपये आहेत. हे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर केले जातात. आता तुम्हालाही घर बसल्या रोजच्या दरांची माहिती मिळू शकते. एका SMS द्वारे हे दर तुम्ही जाणून घेऊ शकता. तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपला इंडियन ऑईल ग्राहक RSP समवेत सिटी कोड वापरुन त्यांच्या मोबाईलवरून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवल्यास रोजचे दर तुम्ही जाणून घेऊ शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा