CNG price team lokshahi
ताज्या बातम्या

Petrol-Diesel Price : महागाईनं बेजार... पेट्रोल-डिझेलनंतर CNG महागलं

महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. दिवसेंदिवस प्रचंड महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल च्या वाढलेल्या किमतीनंतर आता CNGच्या दरात वाढ झाली आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत.

Published by : Team Lokshahi

महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. दिवसेंदिवस प्रचंड महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल च्या वाढलेल्या किमतीनंतर आता CNGच्या दरात वाढ झाली आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत गेल्या 70 दिवसांहून अधिक काळापासून पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या दरांत (Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कापत केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे.

याच्याचसोबत आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांना सीएनजी 86 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 52.50 रुपयांने खरेदी करावा लागेल.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई 106.25 94.22

पुणे 105 92

नागपूर 106.03 92.58

हिंगोली 107.29 93.80

नाशिक 106.74 93.23

नांदेड 108.24 94.71

धुळे 106.05 92.58

परभणी 108.92 95.30

नंदुरबार 106.99 93.45

रायगड 105.96 92.47

वर्धा 106.56 93.10

अकोला 106.05 92.55

जालना 107.76 94.22

चंद्रपूर 106.14 92.70

सांगली 105.96 92.54

वाशिम 106. 37 93.37

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड