गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Prices) दरवाढीचं सत्र काही केल्या थांबत नाहीये. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची गेल्या पंधरा दिवसांतील ही तेरावी वेळ आहे. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ झाली. तेल कंपन्यांनी राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत आता पेट्रोल 104.61 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे, तर डिझेल सुमारे 96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत (Mumbai)पेट्रोल 119.67 रुपये तर डिझेल 104 रुपयांच्या जवळपास विक्री करत आहे. कंपन्यांनी 15 दिवसांत 13 वेळा भाववाढ केली असून आतापर्यंत 9.40 रुपयांनी भावात वाढ झाली आहे.
इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी (Indian Petroleum Marketing Company) इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 5 एप्रिल 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.67 रुपये झालाय,तर डिझेलचा दर 103.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय. राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलताहेत. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढं डिझेल विकलं जात आहे.
कोणत्या दिवशी पेट्रोलचे दर किती वाढले?
- 22 मार्च - 80 पैसे
- 23 मार्च - 80 पैसे
- 25 मार्च - 80 पैसे
- 26 मार्च - 80 पैसे
- 27 मार्च - 50 पैसे
- 28 मार्च - 30 पैसे
- 29 मार्च - 80 पैसे
- 30 मार्च - 80 पैसे
- 31 मार्च - 80 पैसे
- 02 एप्रिल - 80 पैसे
- 03 एप्रिल - 80 पैसे
- 04 एप्रिल - 40 पैसे
- 05 एप्रिल - 80 पैसे
शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 119.67 रुपये 103.92 रुपये
पुणे 119.07 रुपये 101.78 रुपये
नाशिक 119.11 रुपये 101.83 रुपये
परभणी 122.01 रुपये 104.62 रुपये
औरंगाबाद 119.97 रुपये 102.65 रुपये
कोल्हापूर 119.69 रुपये 102.41 रुपये
नागपूर 119.33 रुपये 102.07 रुपये