पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मध्यमवर्गीय नागरिकांचे महिन्याचे अर्थगणित पेट्रोल डिझेलच्या दरावरच अवलंबुन असते. अश्यातच आता आजपासून पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू झाले असून या वेळेला महाराष्ट्रात डिझेल आणि पेट्रोलचे दर कायम असल्याचे पाहायला मिळाले. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात काही बदल झालेला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.
साधारण पणे इंधनाचे दर हे सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात. आणि त्यानंतर ते सर्वसामान्य नागरिकांना कळवले जातात. आज 3 जूनला सकाळी हे दर जाहीर केले गेले त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पेट्रोलचा दर 103.72 इतका असुन डिझेल चा दर 90.24 रुपये इतका आहे. कोकण आणि विदर्भात हा दर थोड्या फरकाने सारखा असून नवीन दर आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात लागू झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा मालाच्या किंमतीमध्ये चढउतार झाले की, त्यानुसार पेट्रोल डिझेलचे दर बदलत असतात. मालवाहतूक शुल्क आणि स्थानिककर , व्हॅट या गोष्टींवर पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी जास्त होत असतात. मात्र आता आपल्या शहरातील डिझेल पेट्रोलचे दर तुम्ही एका एस एम एसच्या "SMS क्लिकवर जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एका क्लिकद्वारे दर घरबसल्या समजू शकतात.