ताज्या बातम्या

क्रूडच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले?

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार उसळी पाहायला मिळत आहे

Published by : Siddhi Naringrekar

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार उसळी पाहायला मिळत आहे आणि ती वाढतच आहे. आज कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 88 डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या महागाईमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात आज उसळी दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडचे दर आज प्रति बॅरल 88 डॉलरच्या जवळ आले आहेत. ब्रेंट क्रूडचा दर 1.71 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे आणि तो प्रति बॅरल $ 87.63 वर कायम आहे. डब्ल्यूटीआय क्रूडमध्ये 1.22 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ती प्रति बॅरल $ 81.31 च्या दराने आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर

दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर,

डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर