ताज्या बातम्या

अफजलखान वधाचा फोटो घराघरात लावा - कालीचरण महाराज यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा किल्ले प्रतापगडावर कोथळा काढून स्वराज्यावर आलेले संकट दूर केले.

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा किल्ले प्रतापगडावर कोथळा काढून स्वराज्यावर आलेले संकट दूर केले, तोच दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला आहे. शिवप्रताप दिन साजरा करणे हा हिंदूंचा मूलभूत आणि नैसर्गिक अधिकार आहे. प्रत्येक शिवभक्ताने अफजलखान वधाचा फोटो आपल्या घरात लावावा असे आवाहन प्रखर हिंदुत्ववादी व्याख्याते कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी वाई येथील कार्यक्रमात केले आहे.

अफजलखानाची पिलावळ आजही जिवंत असून देशात अशांतता पसरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. राज्यसह देशात हजारो मुलींना लव्हजीहादच्या माध्यमातून बळी घेतले जात आहेत. देशात जातीयवाद फोफावला आहे. राजकारणाचे हिंदूकरण करण्याची गरज आहे. देशात माजलेला देशद्रोह संपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवप्रेमींना केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा