अमोल धर्माधिकारी, पुणे
बारामती शहरात पवार कुटुंबांच्या बॅनरची चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण पवार कुटुंब एकाच बॅनरवर झळकले आहे. जयसिंग ( बबलू ) देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा बॅनर बारामतीतील मुख्य चौक असलेल्या तीन हत्ती चौकात लावण्यात आला आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता बारामतीत लागलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार यांचा एकाच बॅनरवर फोटो लावण्यात आला आहे.
कालच बारामतीतील बुरूड गल्ली परिसरात युगेंद्र पवार यांच्या बॅनर लागले होते यात भावी नव्हे फिक्स आमदारच असा मजकूर लिहिण्यात आलेला होता.