Pimpri-Chinchwad Election : सध्या राज्यात महापालिका निवडणुकाची प्राचारार्थची रणधुमाळी दिसत आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडवणार असल्याने सध्या सभेतून राजकीय नेते विरोधकांना टोलाबाजी करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शेरोशायरीतून टोला लगावला होता. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "फरिंदे को मिलेगी मंजिल ये उनके फंक बोलतेते है, वही लोग राहते है खखमोश जिनेक. काम बोलते है" असे म्हणाले होते. आता या लगावलेल्या टोल्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शेरोशायरीतून जुगलबंदी रंगली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शायरीतून अजित पवार यांना टोला लगावला होता. त्याला अजित पवार यांनी रविवारी शायरीतूनच प्रत्युत्तर दिले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, "मध्ये काही मोठी लोक येऊन शेर शायरी करून गेले आहेत...मला ही खुम खुमी आली आहे. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता कई सपने घमंड और गलत दिशा में टूट जाते है। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता। जमाना उसीको पहचानता है। जो मैदान में उतरकर साबित करें..." असे अजित पवारांनी म्हटले आहे.
थोडक्यात
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शेरोशायरीतून जुगलबंदी रंगली..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शायरीतून अजित पवार यांना टोला लगावला होता.
त्याला अजित पवार यांनी रविवारी शायरीतूनच प्रत्युत्तर दिले आहे.