ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवडची हफ्तेखोरी थेट इन्स्टाग्रामवर; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवडमधील मी भाई आहे, मला हफ्ता द्यायचा. असं म्हणत पान टपरी चालकास मारहाण केली अन् याचा व्हिडीओ थेट इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

Published by : Dhanshree Shintre

पिंपरी चिंचवडमधील मी भाई आहे, मला हफ्ता द्यायचा. असं म्हणत पान टपरी चालकास मारहाण केली अन् याचा व्हिडीओ थेट इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पिंपळे गुरव मधील हा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला.

यानिमित्ताने पिंपरी चिंचवडमधील हफ्तेखोरी उजेडात आली. हफ्ता म्हणून पैसे अन गुटखा घेणाऱ्या या भामट्याने टपरी चालकाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण ही केली. या निमित्ताने हफ्तेखोरी अन् शहरात गुटखा विक्री होते, हे ही समोर आलं. अनेकांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ पोहचला, ही दृश्य पाहून अनेकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचा वचक राहिलाय की नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

मग पोलिसांना ही जाग आली, खबऱ्यांकडून या उदयास येणाऱ्या भाईची माहिती मिळविण्यात आली. हा पिंपळे गुरव मधील नकुल गायकवाड असल्याचं सांगवी पोलिसांना समजलं अन् तातडीनं त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. आता इन्स्टाग्रामवर मिरविणाऱ्या या भाईची मस्ती पोलीस योग्यरीत्या उतरवतील, अशी अपेक्षा शहरवासीय बाळगून आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट