पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी तरुणीशी शारिरीक संबंध ठेऊन तिला गर्भवती केले. त्यानंतर तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळून जबरदस्तीने पीडितेला खाण्यास दिले. सदर प्रकार हिंजवडी येथे घडली आहे. आरोपीने आदर्श मेश्राम असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या लक्षात आले की, आपला गर्भपात झाला, आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याने पीडितेने आपली फसवणूक झालेल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा...