Nagpur : विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं इमर्जन्सी लैंडिंग Nagpur : विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं इमर्जन्सी लैंडिंग
ताज्या बातम्या

Nagpur Emergency landing : विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं इमर्जन्सी लैंडिंग

नागपूर विमान: पक्षी धडकल्यानं इमर्जन्सी लँडिंग, 272 प्रवासी सुरक्षित

Published by : Team Lokshahi

नागपूरहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला (IndiGo Flight 6E812) हवेत असताना पक्षी धडकल्याची घटना घडली. या धडकेनंतर विमानाच्या पुढील भागाचं नुकसान झालं. विमानात एकूण 272 प्रवासी होते. मात्र वैमानिकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विमानाचं नागपूर विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाला पक्षी धडकला. त्यामुळे विमानाचं संतुलन बिघडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यावेळी केबिन क्रूने प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पायलटने तात्काळ निर्णय घेत नागपूरमध्येच विमान उतरवलं.

या घटनेनंतर सीनियर एअरपोर्ट डायरेक्टर आबिद रूही यांनी माहिती देताना सांगितलं की, “इंडिगोच्या नागपूर-कोलकाता 6E812 विमानाला पक्षी धडकल्याची शक्यता आहे. विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली असून या घटनेची चौकशी सुरू आहे.”

एविएशन इंडस्ट्रीमध्ये ‘बर्ड हिट’ गंभीर मानला जातो. विशेषत: टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी अशा घटना घडल्यास इंजिनमध्ये बिघाड होऊन अपघाताचा धोका निर्माण होतो. नागपूरमधील या प्रकरणात वैमानिकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षण मुद्द्यावरून दुपारी 12 वाजता राज्य मंत्री मंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक

Horoscope | 'या' राशीच्या लोकांच्या कामानिमित्त मोठ्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

CM Devendra Fadnavis : मराठा समाजाचा हिताचा तोडगा निघाला, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया