Admin
ताज्या बातम्या

पीएम किसान योजनेच्या तेरावा हप्ता; 'या' महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार पैसे

पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते.

Published by : Siddhi Naringrekar

पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते. या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता आहे. या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

योजनेतंर्गत तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. अशी माहिती मिळाली आहे.

पीएम किसान योजनेचे नोडल अधिकारी भगवान कांबळे यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (EKYC) झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे अथवा त्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी बँक खाती इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडावीत व बँक खात्यामध्ये जमा होईल. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी (eKYC PMKisan) करुन घ्यावे, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी अथवा बँक खाते आयपीपीबीमध्ये भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात यावेत. असे त्यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात