ताज्या बातम्या

PM-Kisan Samman Nidhi: पुढचा हप्ता हवा असेल तर, केवायसीसोबतच आता करावं लागेल आणखी एक 'महत्त्वाचं' काम!

PM-Kisan Samman Nidhi योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसीसह आता आणखी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Published by : Team Lokshahi

पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दर चार महिन्यांचा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते जमा झाले आहेत. यानुसार 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता.

आता 19वा हप्ता लवकरच मिळणार अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता येणारा हफ्ता हा 19 वा हफ्ता असेल यादरम्यान डिसेंबरच्या अखेरी आणि जानेवारीच्या सुरुवातीला पंतप्रधान किसान योजनचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणं आवश्यक आहे. पण आता शेतकऱ्यांना जर या पुढच्या हफ्त्याचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांना आणखी एक महत्त्वाचं काम करायला लागणार आहे.

शेतकऱ्यांना काय करावं लागणार?

शेतकऱ्यांना या योजनेचा हफ्ता हवा असले तर त्यांना केवायसी करण महत्त्वाचं होते मात्र आता त्यांना ‘फार्मर रजिस्ट्री’ करणं अत्यावश्यक आहे. नाहीतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी असूनही पुढचा हप्ता मिळणार नाही, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘फार्मर रजिस्ट्री’ नाही केली तर पंतप्रधान किसान योजनेचा मिळणारा लाभ मुकवावा लागू शकतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने पात्रतेसाठी देखील काही अटी ठेवलेल्या आहेत. जे शेतकरी आयकर भरतात तसेच कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरीदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही पद असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

फार्मर रजिस्ट्री म्हणजे काय?

फार्मर रजिस्ट्री केल्याने शेतकऱ्याला फार्मर आयडी दिले जाईल म्हणजेच एकप्रकारे आपलं डिजिटलायझेशन होतं. ॲग्रिस्टेक, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक ओळखपत्र दिल जाईल. त्यामुळे शेतकऱ्याला या फार्मर आयडीचा वापर करून आणखी विविध योजनानांचा लाभ घेण सोप होईल. अनुदान, कर्ज योजना आणि इतर शासकीय फायदे मिळवण्यासाठी हे फार्मर आयडी अतिशय उपयुक्त ठरू शकते.

फार्मर रजिस्ट्री नोंदणी कशी करावी?

यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला जाऊन तिथं ई केवायसी टॅबवर क्लिक करून आधार क्रमांक नोंदवावा यानंतर फोनवर ओटीपी येईल तो ओटीपी नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या ॲग्रिस्टेकच्या वेबसाइटवर जाऊन शेतकरी फार्मर रजिस्ट्री नोंदणी करू शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा