Narendra Modi : नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर दाखल Narendra Modi : नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर दाखल
ताज्या बातम्या

Narendra Modi : नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर दाखल

सध्या दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा जवानांसोबत आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी केली. त्यांनी जवानांच्या शौर्याचे कौतुक करत संपूर्ण देशाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Published by : Varsha Bhasmare

सध्या दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा जवानांसोबत आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी केली. त्यांनी जवानांच्या शौर्याचे कौतुक करत संपूर्ण देशाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींनी पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले, की भारताच्या सैन्याच्या समन्वयामुळेच त्यांना गुडघे टेकावे लागले. सध्या दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

पंतप्रधान मोदींनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावरील आयएनएस विक्रांतला भेट दिली, जिथे त्यांनी नौदल कर्मचाऱ्यांना संबोधित केले आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की आजचा दिवस एक अद्भुत दिवस आहे आणि हे दृश्य संस्मरणीय आहे. यावर्षी स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील नौदल कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा अनुभव मिळाल्याने ते भाग्यवान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जवानांना संबोधित करताना सांगितले की, तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे माझं मोठे सौभाग्य आहे, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. माझ्या एका बाजूला समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शूर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. या समुद्राच्या पाण्यावर चमकणारी सूर्यकिरणे म्हणजे शूर जवानांनी लावलेले दिवाळीचे दिवे आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले की, नौदल कर्मचाऱ्यांना देशभक्तीपर गाणी गाताना आणि त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरचे चित्रण करताना पाहून, “युद्धभूमीवर सैनिकाला काय वाटते ते शब्दात वर्णन करता येणार नाही.” “आज एका बाजूला माझ्याकडे अनंत क्षितिज आहे, अंतहीन आकाश आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे ही विशाल आयएनएस विक्रांत आहे, ज्यामध्ये सर्व शक्ती आहे. समुद्राच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची चमक शूर सैनिकांनी लावलेल्या दिवाळीच्या दिव्यांसारखी आहे.” गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी भाग्यवान आहे की यावेळी मी नौदलाच्या सर्व शूर सैनिकांमध्ये दिवाळीचा हा पवित्र सण साजरा करत आहे.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा