ताज्या बातम्या

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला.

Published by : shweta walge

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. एका सामान्य कुटुंबातून आलेले पंतप्रधान मोदी आज जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत सामील झाले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे प्रचारक म्हणून झाली आणि हळूहळू ते भारतीय जनता पक्षाचे एक बोलके नेते म्हणून उदयास आले. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी 2001 ते 2014 दरम्यान 12 वर्षांहून अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.

नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांचा जन्म झाला असे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान. समर्पित वृत्ती, दृढनिश्चय आणि रात्रंदिवस केवळ जनतेच्या प्रगतीचा ध्यास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

पंतप्रधान मोदींना तरुणपणी संन्यास घेण्याची इच्छा होती. त्यांनी जवळजवळ दोन वर्षे हिमालयात एकांतात घालवली, जिथे त्यांनी ध्यान केले आणि हिंदू धर्माचे तत्वज्ञान स्वीकारले.

पंतप्रधान मोदी हे त्यांच्या दिवसाची सुरुवात योगा करूनच करतात. ते पंचतत्व योगा दररोज न चुकता करतात. पंचतत्व योगा म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गाच्या पाच घटकांची संबंधित असलेला योगा. हा योगा करताना पंतप्रधान मोदी विरुद्ध दिशेने चालतात, खडकांवर चालतात किंवा चिखलात चालतात तसेच खडकांवरती ते पाठीवरती झोपतात. अशा प्रकारे हा योगा ते करतात. हा योगा केल्यानंतर शरीरातील रक्ताभिसरण होण्यास मदत होते आणि शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 73 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी विश्वकर्मा जयंतीही आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री फडणवीस उद्या यवतमाळ दौऱ्यावर

Delhi High Court Bomb Threat : "न्यायाधीशांच्या कक्षात 3 बॉम्ब" दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी; परिसर तात्काळ रिकामी तर खबरदारी म्हणून...

School Bus Accident : नागपूरमध्ये दोन स्कूल बसचा अपघात; काही विद्यार्थी जखमी

Murum Minning : पंढरपूर-कुर्डू गावात आज बंदची हाक; मुरूम उत्खनन प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी बंद