ताज्या बातम्या

मुक्ता टिळक यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रध्दांजली; भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता नेहमीच संस्मरणीय

मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांना सर्वपक्षीयांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांना सर्वपक्षीयांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीत मुक्ता टिळक यांना श्रध्दांजली वाहिली आहे. भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता कार्यकर्त्यांसाठी नेहमीच संस्मरणीय राहील, असे त्यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुक्ता टिळक यांनी समाजाची आत्मीयतेने सेवा केली. लोकोपयोगी मुद्दे उपस्थित करून त्यांनी आपला ठसा उमटवला आणि पुण्याच्या महापौर म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता कार्यकर्त्यांसाठी नेहमीच संस्मरणीय राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तर, मुक्ता टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, मुक्ता टिळक मागील काही वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होत्या. आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. व आज साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे उद्या सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा