PM Narendra Modi 
ताज्या बातम्या

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घर मिळालेल्या एका आदिवासी कुटुंबाला भेट देऊन संवाद साधला

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • ओडिशा दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष क्षणाचा अनुभव घेतला

  • पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घर मिळालेल्या एका आदिवासी कुटुंबाला भेट देऊन संवाद साधला

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला

(PM Narendra Modi) ओडिशा दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या वाढदिवशी विशेष क्षणाचा अनुभव घेतला. त्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घर मिळालेल्या एका आदिवासी कुटुंबाला भेट देऊन संवाद साधला. या भेटीदरम्यान कुटुंबाने पंतप्रधानांना सन्मानाने खिरी खायला दिली. हा साधा परंतु हृदयस्पर्शी प्रसंग मोदींसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.

मोदींनी सांगितले की, त्या कुटुंबाचा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान त्यांना फार भावले. "जेव्हा त्या आदिवासी बहिणीने मला खिरी खाऊ घातली, तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली," असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी वाढदिवसादिवशी ते नेहमी आईकडून आशीर्वाद घेत असत आणि आई त्यांना गूळ खायला द्यायची.

"आज माझी आई नाही, पण या आदिवासी आईने खीर खाऊ घालून मला वाढदिवसाचा आशीर्वाद दिला. हा अनुभव माझ्या आयुष्याची मोठी कमाई आहे," असे मोदींनी सांगितले. त्यांनी यावेळी समाजातील बदल आणि आदिवासी, वंचित, गरीब कुटुंबांच्या आयुष्यातील प्रगती यामुळे त्यांना अधिक प्रेरणा मिळते, असेही स्पष्ट केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा