Narendra Modi  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Narendra Modi in Sydney : पीएम मोदींची ऑस्ट्रेलियातील ऑलिम्पिक पार्कमध्ये जोरदार फटकेबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. सिडनीतल्या कुडोस बँक एरिनामध्ये भारतीय पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Published by : shweta walge

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. सिडनीतल्या कुडोस बँक एरिनामध्ये भारतीय पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी २० हजार भारतीयांना संबोधित केले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच भारतीय पंतप्रधानांनी उपस्थितांना त्यांच्या जुन्या वचनाची आठवण करून दिली.

नरेंद्र मोदी म्हणाले की,

मी २०१४ ला ऑस्ट्रेलियाला आलो होतो, तेव्हा मी एक वचन दिलं होतं की तुम्हाला पुन्हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची २८ वर्षे वाट पाहावी लागणार नाही. बघा आता मी पुन्हा तुमच्यासमोर हजर झालो. यावेळी मी एकटा आलो नाही, तर एक खास व्यक्ती माझ्याबरोबर आहे. माझ्याबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीसही आले आहेत. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून या कार्यक्रमासाठी वेळ काढला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आपली जीवनशैली वेगळी असू शकते, परंतु आता योग देखील आपल्याला जोडतो. क्रिकेटशी आमचा बराच काळ संबंध आहे, पण आता टेनिस आणि चित्रपटही आम्हाला जोडत आहेत. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे अन्न तयार करू शकतो, परंतु मास्टरशेफ आता आम्हाला एकत्र करत आहे. तुम्ही सर्वांनीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला हे जाणून मला आनंद झाला. आमच्या क्रिकेटच्या नात्याला 75  वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील स्पर्धा जितकी रंजक असते, तितकीच आमची मैदानाबाहेरील मैत्री अधिक घट्ट असते.

भारतीय खाद्यपदार्थांबाबत पंतप्रधान म्हणाले की, हॅरिस पार्कमध्ये जयपूर स्वीट्सची 'चाटकाज' 'चाट' आणि 'जलेबी' अतिशय चवदार असल्याचे मी ऐकले आहे. तुम्ही सर्वांनी माझे मित्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना त्या ठिकाणी घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे.

दरम्यान, भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सिडनी येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ वर्षांनी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. ऑस्ट्रेलियातले भारतीय वंशाचे लोक त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने जमले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार